जिल्ह्यातील डोंगरगाव येथे आज दि 18 नोव्हेंबर ला 9 वाजता सकाळी एक नर अस्वल घरात घुसल्याने एकच खळबळ उडाली. मात्र गावकऱ्यांचे धैर्य, वन विभागाची तातडीची कारवाई आणि तज्ज्ञ पथकाच्या मदतीने ही धोकादायक परिस्थिती अत्यंत सुरक्षितपणे हाताळण्यात आली. अखेर अस्वलाला बेशुद्ध करून चंद्रपूर येथील टायगर ट्रान्झिट सेंटर (TTC) येथे हलविण्यात आले.