काटोल पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या यश विनोद गायकवाड वय १९ वर्ष या आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.तपासादरम्यान आरोपीने त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने काटोल परिसरातील पानबाडी, येरला गोटे आणि धंतोली भागातून एकूण ४ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी या सर्व दुचाकी जप्त केल्या.