महाराष्ट्राची शौर्य परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गड-किल्ल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी पनवेल शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने दिवाळीच्या निमित्ताने किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात आज मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास आमदार प्रशांत ठाकूर आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. मराठी संस्कृती, गौरवशाली इतिहास आणि स्वराज्य संकल्पना तरुणाईच्या मनात रुजवण्यासाठी हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही अभूतपूर्व प्रतिसादात संपन्न झाला.