जालना: जालन्यात एकाचा खून; जमावाने संशयित आरोपीचे घर जाळले...
अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या; एका आरोपीला पोलिसांनी घेतले ता
Jalna, Jalna | Apr 20, 2026 जालन्यात दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, संतप्त जमावाने संशयित आरोपीचे घर जाळल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. कैलास दत्तू पवार असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचा मृतदेह दरेगाव शिवारातील जंगलात आढळला. धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी विक्की मांडोळेसह चार जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य संश