अमरावती: खून प्रकरणातील फरार आरोपी मनोहर खंडातेला वर्धा जिल्ह्यातून अटक, राजापेठ पोलिसांची कारवाई
खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात निर्दोष सुटलेला आणि सर्वोच्च न्यायालयीन अपील प्रकरणात दीर्घकाळ गैरहजर राहिलेला आरोपी मनोहर केशवराव खंडाते (वय ५५, रा. दुधगंगा कॉलनी, जेवड नगर, अमरावती) अखेर पोलिसांच्या हाती लागला. कलम ३०२ भादवीमध्ये खंडाते निर्दोष सुटला होता. मात्र, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. २०१२ पासून प्रलंबित असलेल्या क्रिमिनल अपील प्रकरणात तो गैरहजर राहिला. जिल्हा न्यायाधीश-५ तथा अपर सत्र न्यायाधीश, अमरावती यांनी ४ सप्टेंबर २०२५ रोजी त्याच्याविरुद्ध पकड वॉरंट क