भंडारा जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदी पुन्हा एकदा जयश्री रवींद्र बोरकर यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे. त्यांच्या कामाची पावती म्हणूनच काँग्रेसने ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या बैठकीत, काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांनी संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या महिला जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. मागील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महिला आघाडी बरखास्त झाली होती.