चंद्रपूर: जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत खा. प्रतिभा धानोरकर यांची आक्रमक भूमिकेमुळे; जमिनीच्या मोबदला २४ वरून २६ लक्ष रुपये
टाकळी -जेणा- बेलोरा कोळसा खाण क्षेत्रातील बेलोरा गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता चांगलाच चिघळला आहे. किमान ८० ते १०० एकर जमिनीची विक्री कंपनीने करून दिल्याशिवाय ग्रामदैवत भंगाराम मंदिराला हटवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज दि.१६ सप्टेंबर ला ५ वा जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी प्रशासनाला तातडीने निर्देश दिले आहेत.