मिरज: सांगलीतील माधवनगर कर्नाळ येथे रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू
Miraj, Sangli | Sep 15, 2025 सांगलीतील माधवनगर कर्नाळ जवळ रेल्वे रुळावर पुरुष जातीचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आला मृत व्यक्ती रेल्वे रुळावर रेल्वेची धडक बसून मयत झाल्याचे निदर्शनास आले घटनास्थळी आरपीएफ पोलीस स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक दाखल झाले घटनास्थळी येऊन घटनेची पाहणी करून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यास घटनेची माहिती दिली घटनास्थळी सांगली ग्रामीण पोलीस दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला अमन दीपक आवळे वय वर्ष 23 राहणार माधव नगर