नागपूर ग्रामीण: हायटेक नागपूरचा 'फ्लाईओव्हर' विळखा; ५५० कोटी खर्चूनही गुन्हेगारांचा माग मिळेना; काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार
आजचे नागपूर हे पूर्णपणे बदलले आहे. विकसित, हायटेक आणि 'स्मार्ट सिटी' अशी ओळख मिरवणाऱ्या या शहरात जिथे पाहावे तिथे फ्लायओव्हर्सचे जाळे पसरले आहे. शहराचा कायापालट इतका झाला आहे की, नवीन माणूस सोडाच, पण एखादा जावई जर सासरच्या घरी जायला निघाला, तर त्यालाही रस्ता सापडणे कठीण झाले आहे. मात्र, याच झगमगाटाच्या मागे सुरक्षेचा एक मोठा 'अंधार' दडला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.