जालना: कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात जनजागृतीसाठी पोलीसांचा पुढाकार; विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्र यांच्या हस्ते उद्घाटन
Jalna, Jalna | Oct 14, 2025 जालना जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था तसेच सामाजिक शांततेबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाभरात फिरणार्या जनजागृती व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांना कायद्याचे महत्त्व, पोलीस विभागाचे कार्य आणि सामाजिक जबाबदारी याबद्दल माहितीपर चित्रफित दाखविण्यात येणार आहे. या जनजागृती व्हॅनचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांच्या हस्ते मंगळवार,दि.14 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आले.