एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम सुरू असलेल्या घराचा कडीकोंडा तोडून चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मास्टर कॉलनीतील एका संशयिताला शुक्रवारी ९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.