ठाणे: सॅटिस ब्रिज येथे टीएमटी बस चालकाला एका टोळक्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत केली बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल
Thane, Thane | Nov 30, 2025 ठाण्यातील सॅटिस ब्रिज येथे एका टीएमटी बस चालकाला एका टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. काहीतरी कारणावरून तीन ते चार जणांच्या टोळक्याने टीएमटीच्या बस चालकाला बेदम मारहाण करण्यात सुरुवात केली मारहाण करत असताना काही लोक मदतीला धावले, त्यामुळे टीएमटी बस चालक थोडक्यात बचावला. मात्र त्या टोळक्याकडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत बस चालकाला बेदम मारहाण करण्यात आली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.