साकोली येथील भारत सभागृहात श्री योग वेदांत सेवा समिती साकोली तर्फे गुरुवार दि.12 फेब्रुवारीला सायंकाळी 5 ते रात्री नऊ या वेळात मातृ-पितृ पूजन दिवसाचे आयोजन करण्यात आले.अमरावती येथून आलेले अनिलभाई पंजवाणी यांनी यावेळी व्हॅलेंटाईन डे न मानवता 14 फेब्रुवारीला मातृ पितृ दिवस साजरा करून भारतीय संस्कृतीचे जतन करावे हा श्री आसाराम बापूंचा संदेश मार्गदर्शनातून दिला.गुरुवंदना.श्री आशारामायण पाठ,सुंदर नृत्य नाटिका,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले.यावेळी मुलांनी आई-वडिलांचे पूजन करून आदर व्यक्त करणारा अत्यंत भावनास्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महाआरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली