हातकणंगले: साक्षीदार झाल्याच्या रागातून तारदाळ येथे घर व दुचाकीस आग, दोघांना सुनावली पोलिस कोठडी
साक्षीदार झाल्याच्या रागातून दोघांनी एका नागरिकाच्या घरासह दुचाकीस पेटवून दिल्याची घटना संगमनगर, तारदाळ येथे घडली.या प्रकरणी शहापूर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली असून, त्यांना आज रविवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.