अमरावती: महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र कॉलनीत आरोग्य शिबिर
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत अमरावती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी येथे आज 2 रोजी आरोग्य शिबिर घेण्यात आले. आयुक्त सौ. सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त सौ. शिल्पा नाईक, उपायुक्त सौ. डॉ. मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांच्या निदर्शनाखाली हे आयोजन पार पडले. शिबिरात डॉ. स्वाती कोवे (RCH अधिकारी), डॉ. रुपेश खडसे, डॉ. माधवी वानखडे यांनी पर्यवेक्षणाची जबाबदारी पार पाडली. वैद्यकीय अधिकारी