गंगाखेड रोडवर आज एस.टी. महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली असून या अपघातामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. बसचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात धाव घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही