नागपूर ग्रामीण: संशोधन आणि नैतिक मूल्यांची कास धरा: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपूर 'एम्स'मध्ये आवाहन
"वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी ते करुणा आणि प्रामाणिकपणाची जागा घेऊ शकत नाही. विद्यार्थ्यांनी केवळ उपचारांवर लक्ष न देता सेवाभावातून मानवी मूल्यांची जपणूक करावी," असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. नागपूर येथील केंद्रीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) द्वितीय दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या.