अंजनगाव सुर्जी: तालुक्यात मतदार याद्यांमध्ये गोंधळ;कसबेगव्हाण सरपंच शशिकांत मंगळे यांची निवडणूक आयोगाकडे हरकत
2022 पासून रखडलेल
२०२२ पासून रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अखेर जाहीर झाल्यानंतर आता मतदार याद्यांतील मोठ्या त्रुटींमुळे अंजनगाव सुर्जी तालुक्यात गोंधळ उडाला आहे. कसबेगव्हाणचे सरपंच शशिकांत मंगळे यांनी प्रारूप मतदार यादीत अनेक गावांची नावे वगळल्याचा गंभीर आरोप करत निवडणूक आयोगाकडे अधिकृत हरकत दाखल केली आहे.मंगळे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले आहे की, मतदार याद्या प्रसिद्ध करण्यापुर्वी तालुक्यातील सर्व याद्या तपासाव्यात