उमरी तालुक्यातील हस्सा येथील माजी आ. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या शेतातील आखाड्यावर काल रात्रीच्या सुमारास एका बिबट्याने आखाड्यावर असलेल्या कुत्र्यावर हल्ला करत त्याची शिकार केली होती, आजरोजी सकाळी ही घटना उघडकीस आली होती, त्यामुळे हस्सा परिसरातील शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ह्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गोरठेकर बंधुच्या वतीने वन विभागाकडे करण्यात आली आहे.