हवेली: चिंचवडमध्ये साफसफाई करताना आढळलं पुरातन देऊळ
Haveli, Pune | Sep 29, 2025 पिंपरी चिंचवड शहरातील चिचवड परिसरामध्ये साफसफाई करत असताना एक पुरातन काळातील छोटे मंदिर आणि देवी देवतांच्या चार-पाच मुर्त्या आढळून आल्या आहेत. चिंचवड येथील जलतरण तलावा समोरील झाड ही झुळपी साफ करत असताना हे पुरातन मंदिर आणि मुर्त्या आढळून आल्या आहेत. मंदिर आणि मूर्ती आढळून आल्याने त्या ठिकाणी भाविकांनी मंदिर आणि मुर्त्या पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.