जळगाव शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोर समर्थ नगरात घरासमोर चिखल लोटल्याच्या कारणावरून एका कुटुंबीयांनी दोन तरुणांना चापतबुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने मारहाण करून जबर दुखापत केली आहे. याप्रकरणी बुधवारी २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.