समुद्रपूर: मोहगांव येथिल हनुमान मंदीरात घेण्यात आली विष मुक्त आहार अभियानांतर्गत किसान चावळी बैठक
समुद्रपुर तालुक्यातील मोहगांव येथिल हनुमान मंदीरात आज शनिवारी ४ मेला सायंकाळी ७ वाजता गिरड येथील मगन संग्रहालयाच्या वतीने विषमुक्त आहार अभियानांतर्गत शेतकरी चावळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जैविक शेती अभ्यासक चक्रधर भगत, विष्णू बाम्रणवाडे सुरेश सेलोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना रासायनिक खते व कीडनाशकांचा अती वापर मनुष्यांच्या आरोग्यासाठी किती घातक आहे याची सविस्तर माहिती देत निरोगी आयुष्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक शेती तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन केले.