धामणगाव रेल्वे: जळका फाटा नजीक नारगावंडी येथील युवकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ
धामणगाव रेल्वे तालुक्यातील नारगावंडी येथील शुभम वारंगणे (वय ३०) या युवकाचा मृतदेह जळका फाटा परिसरात आढळून आला असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळका फाटा येथे रस्त्यालगत एक व्यक्ती मृतावस्थेत पडलेला असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ ही माहिती मृतकाच्या कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी शुभम याला ऑटोमध्ये टाकून तात्काळ धामणगाव रेल्वे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.