जालना: जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य कर्मचार्यांचा बेमुदत संप; शासकीय कामकाजावर परिणाम संभाव्य
Jalna, Jalna | Apr 21, 2026 राज्यातील शासकीय गट ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचार्यांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजेपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र यांच्या वतीने पूर्वसूचना (नोटीस) देण्यात आली आहे. महासंघाच्या निवेदनानुसार, विविध मागण्यांसाठी यापूर्वीही शासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला होता. यामध्ये वारंवार निवेदने देण्यात आली होती.