भद्रावती: भद्रावती पंचायत समिती गणनिहाय आरक्षण जाहीर.
सभापतीपद ओबीसी महिलासाठी राखीव.
भद्रावती तालुक्यातील पंचायत समिती गणनिहाय आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात आयोजित एका बैठकीत पार पडली असुन क्षेत्रातील पंचायत समितीच्या आठ गणासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तथापी पंचायत समितीचे सभापती पद ओबीसी महिलांकरीता राखीव आहे.गणनिहाय आरक्षण जाहिर करण्यात आल्याने ग्रामीण भागात निवडणूक हालचालींना आता वेग इला आहे.