आंबड : आंबड येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस असून शहरात या आंदोलनाची जोरदार चर्चा रंगली आहे. पिती नगर येथील रस्त्यावर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवावे, या मागणीसाठी समाजसेवक जगन्नाथ नवनाथ ढेरे यांनी 23 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले आहे. नगरपरिषद हद्दीतील पिती नगर परिसरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनचालक, पादचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिक