काटोल पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सरस्वती नगर गार्डनच्या आडोशाला छापा मार कार्यवाही करून राजेंद्र गायकवाड याला सट्टापट्टी चालविताना रंगेहात ताब्यात घेतले त्याच्याकडून नगदी व इतर साहित्य असा एकूण चौदा हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध काटोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे