मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे. देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीत अधिवेशन घेणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दि.१७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता धाराशिव मध्ये नगरपरिषद सभागृहात आयोजित मराठा समाजाच्या बैठकीत दिली आहे.हैद्राबाद गॅझेट, सातारा गॅझेट अंमलबजावणी नंतर हे अधिवेशन होणार आहे अस जरांगे म्हणाले.