जालना: जालन्यात प्रतिबंधित गुटखा विक्रीप्रकरणी युवकाविरुद्ध कारवाई; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दखल
Jalna, Jalna | May 12, 2026 जालना शहरातील अंबड चौफुली बसस्थानक परिसरात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवणार्या एका युवकाविरुद्ध तालुका जालना पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला आहे. मंगळवार दि. 12 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कोंबिंग ऑपरेशनदरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तालुका जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत होते. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल वसंत भगवान धस, पोहेकॉ सचिन आर्य आणि शेंडीवालरे यांनी कारवाई केली.