अकोल्यातून उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सेनेचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवार राहिलेले विजय मालोकार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने अकोला जिल्ह्यात पक्षांतरणाचे वारे वेगाने वाहू लागले आहेत.