विना परमीट अवैधरित्या वाळूची वाहतुक करणाऱ्या डंपरवर सक्षम प्राधिकरणाकडून कारवाई करीत ते वाहन जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यासाठी नेत होते. परंतू डंपर मालकाने चालकासोबत अरेरावी करीत त्याला खाली उतरवून डंपर पळवून नेले. ही घटना १ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजता मेहरुण शिवारातील गोल्डन नेस्ट हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी रविवारी २ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता डंपर मालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.