चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद व १ नगरपंचायत निवडणुका जाहीर
महाराष्ट्र राज्यातील २४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने आज दि ४ नोव्हेंबर ला १२ वाजता पत्रकार परिषदेत मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहे. २ डिसेम्बर ला मतदान तर ३ डिसेम्बर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. ४ नोव्हेम्बरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात १० नगरपरिषद तर ७नगरपंचायती आहे, ६ नगरपंचायतीमध्ये वर्ष २०२२ मध्ये निवडणूक झाली आहे. निवडणूक झालेल्यामध्ये सिंदेवाही, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, कोरपना, जिवती चा समावेश आहे.