भंडारा: बायपास मार्गामुळे पलाडी ग्रामस्थांची समस्या मार्गी लागणार!, माजी खासदार मेंढे यांनी NHAI अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी
भंडारा बायपास मार्गामुळे पलाडी गावातील नागरिकांना होणाऱ्या मोठ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार सुनील मेंढे यांनी दि. 29 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वा. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांना सोबत घेऊन भागाची पाहणी केली. राष्ट्रीय महामार्गावर पलाडी गावाजवळ वळण नसल्याने ग्रामस्थांना आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दीड किलोमीटर पुढे जाऊन परत यावे लागत होते, ज्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. कोका अभयारण्याकडे (Koka Wildlife Sanctuary) जाणाऱ्या या...