15 जानेवारीला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलीस आयुक्तांच्या 'ऑपरेशन थंडर' मोहिमेअंतर्गत सीताबर्डी पोलिसांनी धरमपेठ येथील 'डी-अॅनाटोलीया' कॅफेवर छापा टाकून अवैध हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला आहे. यादरम्यान आरोपी रॉजर अहमद शेख हर्ष प्रकाश राजपाल , आर्य मेश्राम आणि अभिलाष भावे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून हुक्का पॉट, विविध फ्लेवर्सची तंबाखू आणि इतर साहित्य असा एकूण किंमत ५,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध गुन्ह्याच