इगतपुरी: सरकारी कामात अडथळा आणि पोलिसांना शिवीगाळ भोवली : ३ युवकांवर वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सरकारी कामात अडथळा आणि पोलिसांना शिवीगाळ भोवली : ३ युवकांवर वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शनिवारी सायंकाळी वाडीवऱ्हे कौटीफाट्यावर पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांना ३ युवक ट्रिपल सीट आणि विना हेल्मेट मिळुन आले. यावेळी पोलिसांनी त्यांना तुम्हाला फाईन भरावा लागेल असे सांगितले. युवकांना या बोलण्याचा राग आला. त्यांना पोलीस कायदेशीर बाबी समजावुन सांगत असताना युवकांनी आम्ही कायदा बियदा कोलतो अन पोलीसांना बी कोलतो. आम्ही इथलेच असुन तुम्हाला काय करायचे ते करा अ