वर्धा: बालविवाह रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करा-अध्यक्षा रुपाली चाकणकर
Wardha, Wardha | Sep 16, 2025 अक्षय तृतीया व तुळसी विवाहाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असतात. काही ठिकाणी तर जन्मतारखेमध्ये बदल करुन विवाह केले जातात. असे बालविवाह रोखण्यासाठी पोलिस पाटील, ग्रामसेवक यांची बैठक घ्यावी. दामिनी पथक, बिट मार्शल यांनी शाळा, कॉलेज मध्ये जाऊन मुलींचे समुपदेशन करावे. बालविवाह थांबविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून यासाठी सामूहिक प्रयत्न करावे, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केल्या.