अकोला जिल्ह्यात दिवाळीत राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे.. अकोला जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वी अकोला जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. अकोल्यात भाजपने वंचितला मोठा धक्का दिलाय. अकोल्यातील कुरणखेड जिल्हा परिषद मतदारसंघाचे माजी सदस्य आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सुशांत पाटील बोर्डे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय.. भाजपचे सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आणि खासदार अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला..