पातुर: अजित पवारांच्या सुपुत्र पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणावर कामगार मंत्री अनभिज्ञ? राजकीय वादळातही मौनाची भूमिका..
Patur, Akola | Nov 7, 2025 पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कथित जमीन खरेदी व्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा सहभाग असल्याची बातमी झी 24 तासने सर्वप्रथम उघड केली आणि या खुलास्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.दोन दिवसांपासून या प्रकरणावर चर्चा सुरू असताना राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर मात्र संपूर्ण घडामोडीं पासून अनभिज्ञ असल्याचे सांगत होते