पोलादपूर ते महाबळेश्वर रस्त्याच्या रूंदीकरणाच्या कामामुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून, प्रतापगड दर्शनानंतर महाबळेश्वरकडे जाणारी सहलीची बस आंबेनळी घाटात रस्त्यालगतच्या चरामध्ये कलंडल्याची घटना झाली. या अपघातात दरीच्या बाजूऐवजी रस्त्यालगत डोंगराच्या बाजूच्या चरामध्ये सहलीची बस कलंडल्याने मोठा जीवघेणा अपघात टळला आहे. समर्थ ट्रॅव्हल्सची खासगी रामेश्वर आरामबस सहलीच्या विद्यार्थ्यांना घेऊन प्रतापगड दर्शनानंतर महाबळेश्वरकडे निघाली असताना आंबेनळी घाटात या आरामबसचा टायर चरात अडकला.