केज: ईसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीत एका गावात महिलेवर अत्याचार, नराधमाविरोधात गुन्हा दाखल
महिला ही शेतातून काम करून गावात आल्यानंतर तिच्या घराचे कुलूप उघडून आरोपी घरात गेली. आरोपी विकास बबन गोरे (रा. माळेगाव ह. मु. सुर्डी फाटा ता. केज) याने पाठीमागून घरात घुसला. त्याने महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून तिचा विनयभंग करीत तिला त्याच्यासोबत चल सांभाळतो, असे म्हणून तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर त्या नराधमाने त्या महिलेला मारहाण करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. महिलेचा भाऊ सोडविण्यास आला असता त्याला मारहाण केली. महिलेच्या भाच्याने याचा जाब विचारला म्हणून त्याचे डोके फोडले.