वरणगाव नगरपालिकेसाठी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी सुनील काळे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्षाच्या विरोधात वक्तव्य केले आहे. दरम्यान त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांच्यावरील कारवाई अटळ आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय सावकारे यांनी रविवारी 23 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता पत्रकारांशी बोलतांना दिली आहे.