परभणी: इरळद व नरळद गावातील खोट्या ॲट्रॉसिटी थांबवा ग्रामस्थांची पोलीस अधीक्षकांना मागणी
गंगाखेड तालुक्यातील इरळद व नरळद येथील काहीजण गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास देऊन खोट्या अट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्याचा प्रकार होत आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी ग्रामस्थांनी आज रविवार २ नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन निवेदन देत पोलीस अधीक्षक यांना ग्रामस्थांनी सदर घटनेची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.