किनवट: शेतकऱ्यांनी घेराव घातल्याने कृषी विभागाने कारवाई करत बोधडी येथील 5 कृषी सेवा केंद्राना ठोकले सील
Kinwat, Nanded | Oct 22, 2025 अतिवृष्टीने उध्वस्त होऊन अगदी मरणासन्न अवस्थेत असलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील आवश्यक असणारे दर्जेदार बियाणे देण्याऐवजी दर्जेदार बियाणाची कृत्रिम टंचाई निर्माण करत निकृष्ट दर्जाची बियाणे विक्री करू पाहणाऱ्या बोधडी येथील कृषी सेवा केंद्र चालकांना संतप्त शेतकऱ्याने घेराव घालून दर्जेदार बियाण्याचा साठा व विक्री यांचा हिशोब दाखवा असा सवाल करत धारेवर धरले होते, शेवटी ही बाब कृषी विभागाच्या लक्षात येताच त्यांनी पाच कृषी सेवा केंद्राना सील केले असल्याची माहिती आजरोजी दुपारी 2 च्या सुमारा