वणी: ट्रकची कारला धडक,गुरूनगर येथील रहिवासी माजी सैनिक शेख रफिक यांचा मृत्यू, गडचिरोली येथील घटना
Wani, Yavatmal | Nov 5, 2025 गडचिरोली जिल्ह्यात जीलानी बाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या रफिक शेख यांच्या कारला ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवार 4 नोव्हेंबरला रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.