नागपूर ग्रामीण: राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे ट्रॅफिक जाम; गर्भवती महिला अडकली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नागपूर दौऱ्यानिमित्त बुधवारी सकाळी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. यामुळे वर्धा मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे थांबवण्यात आली होती. या सुरक्षा प्रोटोकॉलमुळे चीचभवन परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. याच कोंडीमध्ये प्रसूती कळा येत असलेली एक गर्भवती महिला अडकून पडली.