जालना: जुना जालना भागातील वीज खंडित; नागरिकांचे महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन
Jalna, Jalna | Jun 23, 2026 : जुना जालना परिसरातील मधुबन कॉलनी, राहुल नगर, कचेरी रोड, दुखी नगर आणि राणा नगर या भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी मध्यरात्री महावितरण कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केले. "जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही," असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या शिफ्टमधील महावितरणचे ऑपरेटर रामदास गिते यांनी परमिट बंद केल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. एका चुकीमुळे अनेक भागांतील नागरिकांना रात्रभर अंधारा