धामणगाव रेल्वे: टीएमसी हॉलजवळील नाल्यात आढळला ३० वर्षीय युवकाचा मृतदेह
धामणगाव रेल्वे शहरातील टीएमसी हॉल नजीक आज सकाळी नाल्यात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृताची ओळख सय्यद अमीन सय्यद उस्मान अशी झाली आहे.अमीन हा मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होता. नेहमीप्रमाणे तो सकाळी घराबाहेर पडला होता, मात्र संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. अखेर आज सकाळी स्थानिक नागरिकांना नाल्यात एक मृतदेह दिसून आला.माहिती मिळताच दत्तापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात...