वणी: टिळक चौक येथे शिवसेना ठाकरे गटा कडून भाजप शासनाच्या विरोधात काळी दिवाळी साजरी.
Wani, Yavatmal | Oct 21, 2025 वणी मध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्यासमोरील चौकात आंदोलन केले. चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी शिदोरी आंदोलन करत शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्या; अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली. आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता आंदोलन करण्यात आले