जळगाव: चोरी प्रकरणातील दोन सराईत गुन्हेगारांसह दहा आरोपींना अटक; पोलीस अधिक्षक कार्यालयाची माहिती
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात शेती उपयोगी साहित्य, तोलकाट्यावरील बॅटरी-इन्व्हर्टर आणि मोटारसायकल तसेच कार चोरीच्या घटनांनी शेतकरी आणि व्यावसायिक हैराण झाले होते. अखेर निंभोरा पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी केलेल्या अथक तपासानंतर तब्बल १२ लाख रुपयांच्या मुद्देमालासह चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत. अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयात सोमवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता दिली आहे.