उल्हासनगर: विठ्ठलवाडी परिसरात ज्वेलर्स दुकानात चोरट्याचा कारनामा, सगळ्यांची नजर चुकवून चोरले दागिने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये एका एक व्यक्ती काहीतरी खरेदी करण्याच्या बहाण्याने आला. आजूबाजूच्या ग्राहक आणि नागरिकांचा अंदाज घेऊन सगळ्यांची नजर चुकून काउंटर वर ठेवलेले 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी चोरून पसार झाला. ही सर्व घटना ज्वेलर्स दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा झाली. मणी चोरीला गेल्याचे लक्षात येतात ज्वेलर्स मालकाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली.